जिल्हा परिषद भरती परीक्षा अभ्यासक्रम 2023 | ZP Zilha Parishad Bharti Exam Syllabus :नोव्हेंबर 2023 मध्ये जिल्हा परिषद प्रक्रिया राबविण्यात येत असून यांच्यासाठी लागणारा अभ्यासक्रम कोणता आहे म्हणजेच जिल्हा परिषद भरतीसाठी अभ्यासक्रम कोणता आहे? जिल्हा परिषद भरतीसाठी कोणती पुस्तके वाचावी? जिल्हा परिषद परीक्षेची भरती प्रक्रिया बद्दल सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहत आहोत त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत वाचन आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
जिल्हा परिषद भरती ही ऑनलाईन पद्धतीने आयबीपीएस नामांकित कंपनीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. आणि जिल्हा परिषद भरतीची आयबीपीएस मार्फत घेतली जाणारी परीक्षा ही कशा स्वरूपाची आहे आणि याच्यासाठी परीक्षेला कसे सामोरे गेले पाहिजे आणि सध्या 2023 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर परीक्षा पार पडतात आहेत आणि येणाऱ्या पुढील आगामी 2024 मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर परीक्षांच्या जाहिराती येणार आहेत त्यामुळे आणि या परीक्षा देखील आयबीपीएस कंपनी मार्फत घेतल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्ही जर एकदा अभ्यासाचे योग्य पद्धती अवलंबली तर तुम्हाला यशापासून कोणीही अडवू शकणार नाही. आणि तुम्ही सहजरीत्या जिल्हा परिषद परीक्षा पास होऊ शकता किंवा इथे अपयश आले तरी देखील तुम्ही सर्व सेवेमध्ये सहजरीत्या यश मिळवू शकतात.
जिल्हा परिषद भरती वयाची अट किती आहे?
जिल्हा परिषद भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्ष निश्चित करण्यात आलेली असून मागासवर्गीय गटामधील उमेदवारांना 18 ते 45 वर्षापर्यंत अवयव मर्यादा ठरवण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक पदाच्या पात्रतेनुसार वेगवेगळ्या वयोमर्यादा देखील काही प्रमाणात आहेत. तसेच 2023 मध्ये होणारी जिल्हा परिषद भरती ही खूप वेळेस पुढे ढकलण्यात आली असल्याकारणाने या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना अतिरिक्त दोन वर्षाचा कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे.
परिषद भरती 2023 परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)
- नोव्हेंबर डिसेंबर २०२३ मध्ये जी जिल्हा परिषद भरतीची भरती प्रक्रिया लाभलेली जात आहे त्याच्यामध्ये काय प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत कारण की प्रथमच आयबीपीएसटीसीएस सारख्या कंपनीचे मार्फत या भरती प्रक्रिया लाभविण्यात येत आहेत आणि पूर्वी 2017 18 झालेल्या भरती प्रक्रिया हा पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येत होत्या. परंतु तिथे झालेल्या घोळ आणि वशिलेबाजी मुळे शाळा कंपन्या टीसीएस सारख्या संस्थेमार्फत राबविण्यात येत असल्यामुळे आपल्याला यांच्या परीक्षा पद्धती बद्दल सर्व माहिती असणे गरजेचे आहे. आणि ती माहिती पुढील प्रमाणे नमूद केलेली आहे.

- जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा ही मधील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे किंवा घेण्यात येते.
- सर्वसामान्य प्रश्न 60 असून 40 प्रश्न हे तांत्रिक विषयाशी संबंधित असून हे प्रश्न मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असतात.
- पेपर एक मध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान अशा चार विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- आणि पदासंबंधी असणारे तांत्रिक अभ्यासक्रम मध्ये त्या पदाविषयीच्या 40 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- जिल्हा परिषद भरती प्रक्रिया ही आयबीपीएस कंपनी मार्फत राबवली जात असून ही भाऊ पर्यायी परीक्षा आहे आणि यामध्ये नकारात्मक गुण पद्धतीचा समावेश नाही.
- जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये होणाऱ्या भरती मध्ये प्रश्नपत्रिका येथील प्रश्नही दहावी तसेच बारावी दर्जाचे असतील.

जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम | ZP Bharti Syllabus 2023
मराठी व्याकरण :-
यामध्ये सर्वसामान्य व्याकरण आणि शब्दसंग्रह यांचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये वाक्यरचना वाक्याचे प्रकार व्याकरण कार काळ आणि काळाचे प्रकार अलंकार प्रयोग शब्दाच्या जाती समाज समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द वाक्प्रचार आणि अर्थ व वाक्यात उपयोग अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश हा मराठी विषयाचा निगडित आहे.
इंग्रजी व्याकरण :
Sentence structure
Part of speech
Subject verb agreement
Tense
Direct and indirect speech
Comprehension of passage
Active voice, passive voice
Idioms and phrases
Synonyms, antonyms
सामान्य ज्ञान :
सामान्य ज्ञान मध्ये खूप मोठ्या घटकांचा समावेश करण्यात आलेला असल्याने यासाठी एकच पुस्तक ठरवून त्याच्यावर जास्त वेळेस रिविजन करणे महत्त्वाचे ठरते.
अभ्यासक्रम – आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील समाजसुधारक, भारत व महाराष्ट्राचा भूगोल, भारताची अर्थव्यवस्था, राज्य प्रशासन, व जिल्हा प्रशासन, चालू घडामोडी
अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी – अंकगणित तसेच सामान्य बुद्धी मत्ता क्षमता यावर प्रश्न विचारण्यात येतात.
जिल्हा परिषद भरती पुस्तके |Zp Bharti Booklist
मराठी व्याकरण : तुम्हाला जर तलाठी भरतीची परीक्षा द्यायची असेल तर, महाराष्ट्र मध्ये सध्या 2023 मध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध असलेले दोन पुस्तक आहेत. एक म्हणजे मोरा वळंबी आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब शिंदे यापैकी तुम्ही कोणतीही एक पुस्तक वाचा आणि त्याला परत परत रिविजन करा म्हणजे की तुमचे एक पुस्तक व्यवस्थित झाले की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर तलाठी होण्यासाठी मराठी हा विषयाचा फायदा होऊ शकतो. आणि या सोबतच तुम्हाला शब्दसंग्रह देखील करावा लागतो.
इंग्रजी व्याकरण : इंग्रजी विषयासाठी महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर साहित्यसमग्री उपलब्ध आहे. त्यामध्ये देखील तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक व्यवस्थित केलं तसेच अनिकेत पाटील एसटीआय सरांचे पुस्तक केले तरी तुमचं इंग्रजी विषय सहज रित्या पूर्ण होऊन जाईल.
सामान्य ज्ञान : सामान्य ज्ञान साठी महाराष्ट्रात एकमेव सर्वात प्रसिद्ध पुस्तके म्हणजे तात्याचा ठोकळा एकनाथ पाटील यांचे प्रसिद्ध पुस्तक यांच्या माध्यमातून तुम्ही सामान्य ज्ञानचा अभ्यास सहजरीत्या पूर्ण करू शकता. आणि त्यासोबत तुम्हाला चालू घडामोडी करायची असेल तर बाजारातील कोणतीही एक वार्षिक घेऊन तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास देखील करू शकतात.
गणित आणि बुद्धिमत्ता : गणित बुद्धिमत्ता साठी सर्वात प्रसिद्ध असे स्पर्धा परीक्षेचे लेखक महाराष्ट्रातील ते म्हणजे की सचिन ढवळे सर गणितासाठी अंकगणित व तर्क क्षमता असे सचिन ढवळे सरांचे पुस्तक आहे. याचा कोणतीही परीक्षा देण्यासाठी महाराष्ट्रातील खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना फायदा होतो. आणि दुसरे पुस्तक आहे बुद्धिमत्ता हे पुस्तक देखील तुमचे बुद्धिमत्ता क्षमता चाचणी सहजरित्या सर्व अभ्यासपूर्ण होईल.
जिल्हा परिषद भरती परीक्षा अभ्यासक्रम व पुस्तके 2023 | ZP Zilha Parishad Bharti Exam Syllabus and Exam Pattern FAQ
जिल्हा परिषद भरती परीक्षा कधी आहे?
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद परीक्षा ही आयबीपीएस नामांकित कंपनी मार्फत घेण्यात येत असून ही परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात झेडपी भारती 2023 साठी शेवटची तारीख कोणती आहे?
महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती अंतर्गत ऑनलाइन प्रकारे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 होती.
झेडपी भारती परीक्षेची 2023 फी किती आहे?
जिल्हा परिषद परीक्षेची खुला प्रवर्ग 1,000/- रुपये आणि मागास प्रवर्ग 900/- रुपये अशाप्रकारे निश्चित केलेली आहे.
महाराष्ट्रात झेडपी परीक्षा कोण घेत आहे?
महाराष्ट्रातील 2023 ची परीक्षा ही आयबीपीएस कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा ह्या महापोर्टल मार्फत घेण्यात आलेल्या होत्या परंतु आतापर्यंत झालेला घोटाळा आणि वशिलेबाजी यांच्यामुळे महापोर्टलमार्फत घेण्याचा निर्णय हा रद्द केलेला असून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद परीक्षा नामांकित कंपनी मार्फत घेण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेसाठी अर्ज कसा करायचा?
महाराष्ट्र जिल्हा परिषदेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती आपल्या पोस्टमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही जर पोस्ट सर्व व्यवस्थित वाचली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आणि ऑनलाईन प्रकारे अर्ज करत असल्यास महाराष्ट्र सरकार आयबीपीएस कंपनीने नवीन लिंक ओपन करून दिलेली याच्यामार्फत महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या अर्ज ऑनलाईन प्रकारे सादर करता येतो.