तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तक यादी | Talathi Bharti Syllabus and Exam booklist 2023 : नमस्कार मित्रांनो आपल्याला तर माहित आहेच की, सरकारने नुकतीच तलाठी भरती विषयी नवीन प्रसिद्धी पत्र जाहीर केलेले आहे. त्यामुळे लवकरच तलाठी भरतीची मोठी जाहिरात येणार असून 2023 मध्ये ही एक भरतीची पूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती राज्य शासनाने या प्रसिद्धी पत्रकामध्ये जाहीर केलेली आहे.
2023 मध्ये तलाठी भरतीच्या खूप मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत आणि तलाठी भरती 2018 पासून झालेली नव्हती. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर तलाठ्यावर कामाचा बाहेर पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि एक तलाठी चार-चार गावाचं काम करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. या प्रमाणावरच सरकारने लवकरात लवकर 2023 मध्ये सर्व तलाठीचे प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेतलेला असल्याने तलाठी भरती लवकरच होणार आहेत.Talathi Bharti Syllabus
आपलं जर तलाठी व्हायचे असेल तर तर त्यासाठी कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे पदवी धारण करणारे विद्यार्थी तलाठी भरती चा फॉर्म भरू शकतात आणि हेच तलाठी भरतीसाठी पात्र आहेत.
मित्रांनो आपण या पोस्टमध्ये 2023 मध्ये होणाऱ्या तलाठी भरती विषयी सर्व माहिती म्हणजेच की त्याविषयी कोणता अभ्यासक्रम आहे कोणती पुस्तक वाचायची आणि नेमकं का तलाठी परीक्षा पास होण्यासाठी काय? काय करायला हवा आणि अभ्यास पद्धती कशी ठेवावी की जेणेकरून तुम्ही सहजरीत्या तलाठी होऊ शकतात.
आणि आपल्याला तर माहीतच आहे की महाराष्ट्रात तलाठी या पदाविषयी महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षकता असल्याचे आपल्याला पाहायला मिळते कारण की तलाठी हा एक गाव पातळीवरील अधिकारी दर्जाचा व्यक्ती असतो. कारण की आपल्याला तर माहीतच आहे की तलाठीशी आपला सतत गावाला असताना संबंध येत असतो. आपल्याला सातबारा विषयी कामे अशा प्रकारची शेती विषयक सर्व कामे जमीन हस्तांतरण याविषयी प्रत्येक कामामध्ये तलाठ्याचा संबंध आपल्या सोबत येत असतो. आणि आपल्याला तर माहीतच आहे की यांचा पगार आणि बाकी गोष्टी त्यामुळे तलाठी या पदाची महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षकता असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता मिळण्यापूर्वी हे काम करा ; नाहीतर हप्ता मिळणार नाही..! Pm Kisan
तलाठी हा प्रत्येक गावातील नोंदवहीचे दप्तर ठेवण्याचे काम करत असू त्यासोबतच 21 क्रमांकाचे गाव नमुना ठेवण्याची देखील तो काम करत असतो आणि गावातील सर्व प्रकारचे जमिनीचे व्यवहार यांच्या नोंदी नमूद करण्याचे काम तर टिकत असतो. आणि गावामधील जमिनीचा सातबारा आठ अ उतारा याविषयी सर्व बाबी सांभाळण्याची आणि जमीन मालकाला पुरवण्याचे कार्य तलाठी करत असल्याची माहिती आपल्याला माहीतच आहे तर तलाठी होण्यासाठी कशी अभ्यास पद्धती असली पाहिजे आणि तलाठी होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे त्यासाठी पात्रता काय आहे. Talathi Bharti Syllabus
त्यासाठी अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे या प्रकारच्या पण सर्व माहिती या पोस्टमध्ये पाहत होतो आणि तुम्हाला ही पोस्ट वाढल्यानंतर तलाठी भरती 2023 साठी कोणतीही माहिती दुसऱ्या ठिकाणी वाचण्याची गरज पडणार नाही त्यामुळे शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला तलाठी भरती 2023 साठी खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.

तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 ; Talathi Bharti Syllabus
तलाठी हे महाराष्ट्र मधील वर्ग 3 चे महसूल विभागाशी निगडित असलेले एक महत्त्वपूर्ण असून जर आपल्याला तलाठी भरती 2023 चा अभ्यास करायचा असेल तर यामध्ये आपल्याला प्रामुख्याने चार विषयांचा अभ्यास करावा लागतो त्यामध्ये समाष्टी विषय आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता अशा प्रकारचे चार विषयांचा आपल्याला अभ्यास केल्यानंतर तलाठी परीक्षेसाठी आपला अभ्यास सहजरीत्या परिपूर्ण होऊ शकतो. आणि आगामी काळात २०२३ – २४ मध्ये होणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी तुम्हाला या अभ्यासाचा देखील फायदा होऊ शकतो आणि त्यासोबतच तुमचा तलाठी भरतीचा देखील अभ्यास पूर्ण होऊ शकतो. अशा प्रकारे खालील नमूद केलेल्या विषय इतिहास गुण आणि विषय तसेच प्रश्नांची संख्या खालील प्रमाणे असते. Talathi Bharti Syllabus
तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप कसे असते? Talathi Bharti Syllabus and Exam pattern
अ.क्र | विषय | एकूण प्रश्न –प्रश्नांची विभागणी | एकूण गुण – गुणांची विभागणी |
---|---|---|---|
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | English Language | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी आणि अंकगणित | 25 | 50 |
एकुण | 100 | 200 |
तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 talati syllabus information in Marathi
अ क्र | विषय | विषयानुसार अभ्यासक्रम |
---|---|---|
1 | मराठी व्याकरण | मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द)म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रहप्रसिद्ध पुस्तके आणि लेखक |
2 | English Grammar | Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) |
3 | सामान्य ज्ञान | इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक |
4 | बौद्धिक चाचणी आणि अंकगणित | बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.) अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी) |
तलाठी भरती अभ्यासक्रम | Talathi Bharti booklist and syllabus PDF
तलाठी भरती अभ्यासक्रम : Talathi Bharti booklist and syllabus PDF तुम्हाला जर 2023 मध्ये जर तलाठी व्हायचं असेल तर अभ्यास पद्धती कशी असेल हे पाहिजे झाले. तर आता जो सध्या 2023 मध्ये उर्वरित कालावधी आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे योग्य पद्धतीने अभ्यासाचा प्लॅन बनवणे गरजेचे आहे. आणि यासाठी योग्य प्रकारचे नियोजन आणि मार्गदर्शन घेणे देखील गरजेचे आहे असं काही नाही. की तुम्ही क्लास केला पाहिजे तुम्ही घरबसल्या अभ्यास करून देखील तलाठी बनू शकता त्यासाठी तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्ही दररोज सकाळी सात ते रात्री आठ म्हणजे यामध्ये तुम्ही आठ ते दहा तासाचा तुमचा अभ्यासाचा प्लॅन असला पाहिजे. कारण की सध्या तलाठी भरतीची परिषदेचे झाले. तर महाराष्ट्रातील खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी वर्ग आहे.
आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये तलाठी विषयीचे खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षण असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि तुम्हाला जर तलाठी व्हायचे असेल तर, तुम्हाला या स्पर्धेचे सामना सह करावा लागेल त्यासाठी तुमचा अभ्यास देखील असला पाहिजे यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच तुम्हाला करंट म्हणजेच की चालू घडामोडी विषयी देखील चार-पाच क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी देखील पाहणे गरजेचे आहे.
2022 आणि 2023 या वर्षातील तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करायला लागतो त्यासोबत दररोज तुम्हाला तीन-चार तास गणित बुद्धिमत्ता विषयाचा देखील अभ्यास करावा लागेल तसेच तुम्ही त्यासोबतच मराठी व्याकरण हा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर अवघड जाणारा घटक आहे. परंतु याकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष न करता तो देखील व्यवस्थित करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे तुम्ही अभ्यासाचा पर्याय ठेवला तर तुम्ही सहजरीत्या तलाठी बनू शकता. Talathi Bharti Syllabus
2023 मध्ये होणारी तलाठी भरती ही सर्वात मोठी असून 2018 नंतर कोणत्याही प्रकारची सर्वस्वी मार्फत भरती झालेली नाही. त्यामुळे सर्वात मोठी तलाठी पदासाठी ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना जाहीर केलेली आहे.Talathi Bharti Syllabus
तलाठी भरतीसाठी पुस्तके कोणती वाचावी?
Talathi Bharti Syllabus and book
मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे यांचे पुस्तक वाचू शकता.
इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे किंवा अनिकेत पाटील सरांचे पुस्तक खूप छान आहे.
सामान्य ज्ञान विषयासाठी तुम्ही एकनाथ पाटील सरांचा तात्याचा ठोकळा वाचू शकता.
गणित बुद्धिमत्ता हा विषय जर अवघड जात असला तरी यासाठी तुम्ही सचिन ढवळे सरांचे दोन्ही पुस्तके किंवा त्यांची नवीन बदल मध्ये आलेले कृती पुस्तक वाचू शकलो. आणि 2023 मध्ये होणाऱ्या तलाठी भरती आणि इतर सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला फायदा होईल आणि 2024 मध्ये देखील होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला या पुस्तकांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. त्यामुळे कमी पुस्तक वापर आणि त्यालाच खूप जास्त वेळच करा म्हणजे तुम्हाला याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊन जाईल.Talathi Bharti Syllabus
तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तक यादी | Talathi Bharti Syllabus and Exam booklist 2023 FAQ
तलाठी निकाल 2023 कधी आहे?
१५ डिसेंबर २०२३ रोजी तलाठी भरती 2023 चा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती महाभुमी विभागाने आणि महाराष्ट्र सरकार यांनी संयुक्तपणे तलाठी भरती चा निकाल हा पंधरा डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून 26 जानेवारी 2024 ला सर्व उमेदवारांना जॉइनिंग देण्यात येणार असल्याची माहिती देखील महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली आहे.
तलाठी भरती परीक्षा कधी आहे?
मराठी भरतीची परीक्षा ही ऑगस्ट सप्टेंबर 2023 मध्ये झालेली आहे आणि नवीन निघणाऱ्या भरतीची तारीख ही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही नवीन भरतीची तारीख आल्यास आपल्या वेबसाईटवर माहिती देण्यात येईल.Talathi Bharti Syllabus
तलाठी भरती 2023 शिक्षण किती पाहिजे?
तुम्हाला जर तलाठी भरती 2023 चा अर्ज भरायचा असेल तर शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री किंवा समतुल्य समक्ष डिग्री अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता निश्चित केली आहे म्हणजेच कोणत्याही विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केलेली असावी.
महाराष्ट्रात तलाठी परीक्षा कोण घेते?
महाराष्ट्रात तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये ही TCS कंपनीने घेतली आहे. पूर्वी तलाठी भरती परीक्षा ही महापोर्टल कडून राबविण्यात येत होती मार्फत मात्र मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याने आणि वशिलेबाजी झाल्यामुळे ती सीएस कंपनीकडे भरती प्रक्रिया देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला होता अशा प्रकारे महापोर्टल हे बरखास्त करण्यात आल्याने तलाठी भरती परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनी पुढे आलेली आहे.Talathi Bharti Syllabus
तलाठ्याचे काम काय?
सध्या गावांमध्ये तलाठी हा गावातील जमिनीची नोंदवही ठेवतो तसेच कोणाला सातबारा आठ अ उतारा हवा असल्यास तो काढून देतो तसेच जमीन हस्तांतर करायचे असल्यास तसेच जमीन चा वारसदार बदलायचा असल्यास तसेच गावातील जमिनी संबंधी सर्व प्राथमिक कार्य करण्याचे जबाबदारीही तलाठीचे असते आपला तराठ्याशी दररोजचा आणि नित्य नियमाचा संबंध असल्याने तलाठी हे आपल्या सर्वात जवळचे आणि ओळखीचे असे पद आहे.Talathi Bharti Syllabus
मी माझा तलाठी भारतीचा निकाल कसा तपासू शकतो?
2023 मध्ये झालेल्या तलाठी भरतीच्या तुम्हाला निकाल कसायचा असेल तर महाभूमी विभागाच्या अधिकृत www.mahabhumi.gov.in या व्यवसायाचे माध्यमातून तुम्ही आपला तलाठी भरती चा निकाल पाहू शकता.Talathi Bharti Syllabus
तलाटी परीक्षा 2023 साठी कट ऑफ मार्क्स किती आहेत?
तलाठी भरती 2023 चा निकाल अजून महाभुमी विभागाने जाहीर केलेला नाही परंतु सगळीकडे एक अंदाज वर्तवण्यात येत आहे याच्यामध्ये तलाठी भरती 180 दरम्यान राहील अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.